
जम्मू कश्मीर प्रशासनाने गुरूवारी 28 हजार 400 कोटी रुपयांच्या अद्योगिक विकास योजना जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यात गुंतवणूक, रोजगार निर्मिती वाढणार आहे. या योजनेमुळे राज्यातील दुर्गम भागात औद्योगिक विकास होणार आहे.
केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि कश्मीरचे उपराज्यपल मनोज सिन्हा एका कार्यक्रमात म्हणाले की राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने औद्योगिक विकासासाठी योजना मंजोर केली आहे. या योजनेमुळे राज्यात सामाजिक आर्थिक विकासाचे नवे पर्व सुरू होईल आणि जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होती.
सिन्हा यांनी या योजनेची अधिसूचना जारी करून ही योजना एकूण 28 हजार 400 कोटींची असल्याचे सांगितले. तसेच 2037 पर्यंत ही योजना राज्यात लागू राहिल असेही त्यांनी सांगितले. या योजनुळे राज्यात गुंतवणूक वाढेल, राज्यात सुरू असलेल्या उद्योगांना याचा फायदा होईल, तसेच सामाजिक आर्थिक विकासामुळे 4.5 लाख लोकांना रोजगार मिळेल.




























































