Jammu Kashmir – श्रीनगरमध्ये दल सरोवरात शिकारा बोट पलटली, पर्यटकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू

जम्मू-कश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दल सरोवरात अपघात घडला आहे. शिकारा सफरीदरम्यान जोरदारा वाऱ्यामुळे बोट पलटली. पर्यटकांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. शिकारा बोटमध्ये किती पर्यटक होते याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

घटनेचा 17 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पर्यटक पाण्यात तरंगताना दिसत आहेत. तसेच मदतीसाठी आरडाओरडा करत आहेत. सरोवराच्या रेलिंगजवळ उभ्या असलेल्या पर्यटकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे.