पाकड्यांकडून सलग आठव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन; हिंदुस्थानचे चोख प्रत्युत्तर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर (LOC) तणावपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. आता पाकिस्तानची नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही सलग आठवी वेळ आहे. गेले दोन दिवस पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूर भागातील नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार सुरू केला.

दरम्यान, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. पाकिस्तानच्या या कृत्याला हिंदुस्तानी लष्कराच्या जवानांनी सडेतोड उत्तर दिले. यापूर्वीही 28 आणि 29 एप्रिलच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला होता. यातच आता हिंदुस्थानने पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारावर आक्षेप नोंदवत इशारा दिला आहे.

LOC वर गोळीबार त्वरित थांबवा, शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकला हिंदुस्थानचा सज्जड दम