कश्मीर पुन्हा हादरले… सीआरपीएफच्या ताफ्यावर भरदिवसा दहशतवादी हल्ला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशतवादी हल्ल्याने काश्मीर खोरे पुन्हा हादरले आहे. श्रीनगरातील नौगाम परिसरातील पंपोर बायपास येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार करीत हल्ला केला. यात दोन जवान शहीद झाले असून, तीन जवानांची प्रकृती गंभीर आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेले. जवानांकडून युद्धपातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ सुरू आहे.

crpf-convoy

काॅन्स्टेबल शैलेंद्र प्रतापसिंह आणि काॅन्स्टेबल धीरेंद्र त्रिपाठी हे शहीद जवान आहेत. तर उपनिरीक्षक गोरख नाथ, काॅन्स्टेबल किरगेन आणि काॅन्स्टेबल जेम्स यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

crpf-jawan-jammu-kashmir

दहशतवादी हल्ल्यानंतर मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. जवान आणि पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला. दहशतवाद्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

  • जम्मू-काश्मीरात दहशतवादी हल्ले आणि पाकडय़ांकडून सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे.
  • 24 सप्टेंबरला बडगाम येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश बडोले हे शहीद झाले होते. शहीद नरेश बडोले हे नागपूरचे होते.
  • 15 सप्टेंबरला राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात 1 जवान शहीद आणि 2 जवान जखमी झाले.
  • 4 सप्टेंबरला बारामुल्लात सीआरपीएफचे 3 जवान जखमी.
  • जानेवारी ते ऑगस्ट 2020 या आठ महिन्यात पाकिस्तानने तब्बल 3186 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन.