जम्मू कश्मीरमध्ये पोलिसाची गोळ्या घालून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील तंगमार्ग गावात एका पोलिसाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. गुलाम मोहम्मद दार असे त्या पोलिसाचे नाव असून ते वायलू गावचे रहिवासी होते.

दार हे त्यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावरच त्यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोध कारवाई सुरू केली.