
हिंदुस्थानचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱया कश्मीरमधील पर्यटनाची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. गेल्याच आठवडय़ात कश्मीरमध्ये हंगामातील पहिली बर्फवृष्टी सुरू झाली. बर्फाच्या शालीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नंदनवनात येऊ लागलेत. पर्यटन व्यवसाय हा कश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे ही निश्चितच कश्मीरवासियांसाठी आनंदाची बातमी आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून कश्मीरचा पर्यटन व्यवसाय ठप्प होता. तो आता कुठे पूर्वपदावर येऊ लागलाय. त्यातच लगीनसराईचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे प्रीवेडिंग पह्टोशूटसाठी कश्मीरच्या पर्यायाचा लोक पुन्हा एकदा विचार करू लागले आहेत. दल सरोवरात असे प्रीवेडिंग शूट सुरू असलेले दिसते. फोटोसाठी किंवा शूटिंगसाठी कश्मीरशिवाय आणखी कोणते चांगले ठिकाण असू शकते, असं पह्टोग्राफरचं म्हणणं आहे.
वर्षभर ठप्प होता पर्यटन व्यवसाय
5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवण्याआधी सरकारने बाहेरच्या नागरिकांना कश्मीर सोडून जाण्याची अॅडवायझरी जारी केली होती. त्यावेळी पाच लाखांपेक्षा जास्त मजूर आणि विद्यार्थी कश्मीरमधून बाहेर पडले होते. त्यामुळे कश्मीरच्या पर्यटन व्यवसायाचे कंबरडे मोडले. कलम 370 हटवल्यानंतरही काही महिने कश्मीरमधील पह्न आणि इंटरनेट सेवा बंद होती. त्यानंतर तीन महिन्यांनी अॅडवायझरी मागे घेण्यात आली, मात्र पर्यटक परतले नव्हते.
लॉकडाऊनचा फटका
लॉकडाऊनमुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱया अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. टुर ऑपरेटर, शिकारा-चालक, टुरिस्ट क@ब चालवणारे संकटात आहेत. जम्मू-कश्मीरच्या सरकारने शिकारा चालवणाऱयांना तीन महिन्यांपर्यंत एक हजार रुपये देण्याची घोषणा केली. मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचे सांगत आर्थिक पॅकेजची मागणी होत आहे. याशिवाय हजारो क@ब ड्रायव्हर आणि टुर ऑपरेटर्सला लॉकडाऊनचा मार झेलावा लागत आहे.
200 टॅक्सीचालक बेरोजगार झाले
अनेक टॅक्सीचालक 20 हजारांचा ईएमआय भरू शकत नाही. पूर्वी दिवसाला त्यांची अडीच हजारांपर्यंत कमाई व्हायची. मात्र आता एक पैसाही कमाई होत नसल्याचे काही टॅक्सीचालक सांगतात.
17 हजार कोटींचे नुकसान
कश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने डिसेंबर 2019 मध्ये जारी केलेल्या अहवालानुसार, कश्मीरची अर्थव्यवस्थेचे ऑगस्ट ते ऑक्टोबर 2019 दरम्यान 17 हजार 800 कोटी रुपयांचे नुकसाने झाले आहे. सुमारे 4.9 लाख नोकऱया गेल्या. पर्यटन क्षेत्राचे 9 हजार 191 कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि एपूण 1 लाख 40 हजार 500 नोकऱया गेल्या.

























































