देवरुखमध्ये शुकशुकाट; नागरिकांचा जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

525

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला देवरुखमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे देवरुखमध्ये शुकशुकाट असून सर्व दुकाने बंद होती. तसेच नागरिकानांही घरातच राहणे पसंद केले.

देवरुख शहर आणि संगमेश्वर तालुक्यात जनता कर्फ्यूमुळे सर्वत्र शुकशुकाट होता. देवरुख शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळत कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला. देवरुख तहसीलदार,पंचायत समिती,आरोग्य विभाग,रिक्षा संघटना,एस.टी,आगार,पोलीस यंत्रणांनी यात सहभागी होत कोरोनाशी मुकाबला करण्याचा संक्लप व्यक्त केला. तसेच शहरातील व्यापारी वर्गानेही कडकडीत बंद पाळला. देवरुख एस.टी.आगारातून दररोज 694 फेर्‍या सुटतात. या सर्व फेर्‍या रद्द केल्यामुळे प्रवाशी आलेच नाहीत. रेल्वे,खाजगी आराम बस हेदेखील जनता कर्फ्यूमध्ये सहभागी झाले होते. जनतेनेही सकारात्मकता दाखवत रविवारचा जनता कर्फ्यू यशस्वी केला. शहरात महसुल विभाग,आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणा कार्यान्वित होती. त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. एरव्ही रविवार देवरुखचा बाजाराचा दिवस असतो. मात्र, सर्व आठवडी बाजारही बंद करण्यात आल्याने जनता घराबाहेर पडलीच नाही. रिक्षा संघटनांनी एकजूट दाखवत जनता कर्फ्यूत सहभागी होत सहकार्य केले. एस.टी.आगाराने वाहतुक बंद ठेवत कोरोना विरोधातील कर्फ्यूला पाठिंबा दिला.

आपली प्रतिक्रिया द्या