जान्हवी कपूरची ‘टॉलीवूड’मध्ये एन्ट्री

944

धडक या चित्रपटातून 2018 साली बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर आता लवकरच ‘टॉलीवूड’मध्ये म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शक पुरी जगन्नाथ याच्या चित्रपटात जान्हवी विजय देवरकोंडा या अभिनेत्यासोबत दिसणार आहे.

सध्या जान्हवी ‘गुंजन सक्सेना’ या बायोपिकमध्ये व्यस्त असून पुढील वर्षी 2020 मध्ये ती फायटर या दाक्षिणात्य चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहे. दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आलिया भट्ट  किंवा कियारा अडवाणी, अन्यना पांडेला  घेऊन हा चित्रपट करणार होते. मात्र आलियाने दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यास नकार दिला. तर कियाराने बिझी शेड्यूलमुळे हा चित्रपट स्वीकारण्यास नम्रतापूर्ण नकार दिला. त्यानंतर करण जोहरने जगन्नाथ यांना जानव्हीचे नाव सुचवले. दरम्यान जान्हवीने अजून या चित्रपटासाठी तारखा दिलेल्या नसल्या तरी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये चित्रपटाचे शूटींग सुरू होईल असे बोलले जात आहे. यावर दिग्दर्शक जगन्नाथ आणि जान्हवी यांनी कसलीही प्रतिक्रीया दिलेली नाही. पण जानव्हीला दाक्षिणात्य चित्रपटात बघण्यास तिचे चाहते मात्र भलतेच उत्सुक आहेत.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या