‘जनस्थान’चे आयकॉन पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनस्थान ग्रुपतर्फे यावर्षीच्या आयकॉन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ व्हायोलिन वादक अनिल दैठणकर, चित्रकार आनंद ढाकिफळे, ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सुरेश गायधनी आणि अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते चिन्मय उदगीरकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

‘जनस्थान’ ग्रुपच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त सात दिवसांचा उत्सव 18 ते 24 जून या कालावधीत साजरा होणार आहे. याचाच एक भाग म्हणून 22 तारखेला सायंकाळी सहा वाजता परशुराम सायखेडकर नाटय़गृहात जनस्थान आयकॉन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. कलासाधनेच्या माध्यमातून योगदान दिलेल्या नाशिककरांचा या पुरस्काराने गौरव केला जातो. या चौघांना ज्येष्ठ नाटय़ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते गौरवण्यात येईल. या सोहळ्यास नाशिककरांनी हजर राहावे, असे आवाहन ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर यांनी केले आहे.