
जात पूर्व भागातील एका गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या पोटच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन लेकीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधम बापावर रात्री उशिरा उमदी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जत पूर्व भागातील एका गावात 13 वर्षीय मुलीच्या असहायतेचा फायदा घेत बापाकडून गेल्या चार महिने अत्याचार सुरू होता. सदरचा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला होता. तिने याबाबत पतीला सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र तो ऐकत नव्हता. अखेरीस शुक्रवारी सकाळी महिला अंमलदारांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे.
पोलिसांनी पीडित मुलीसह, तिच्या आईचा जबाब नोंदवला आहे. पीडित मुलीने यावेळी अत्याचाराचा पाडा वाचला. पोलिसांनी खाक्या दाखवताच, नराधम बापाने गुन्हा कबुल केला आहे. मात्र, पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला.





























































