
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवदी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर रावबले. याअंतर्गत हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांची दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. त्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानातील तणाव आणखी वाढला आहे. यादरम्यान पाकिस्तानकडून अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध बॉलिवूड लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीरवर टीका केली आहे. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवस आधी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला.
काय म्हणाले होते असीम मुनीर?
हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बरेच फरक आहेत. आणि पाकिस्तानी मुस्लिम प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहेत. ‘आपल्या पूर्वजांना वाटायचे की आपण जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत; आपला धर्म वेगळा आहे, आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे आपल्या भावी पिढ्यांनी पाकिस्तानची कहाणी विसरू देऊ नये, असे विधान पाक लष्कर प्रमुख मुनीर यांनी केले.
राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी घेतलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी आसीम मुनीरने केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. असीम मुनीरच्या टिप्पण्यांवर जावेद अख्तर यांनी टीका केली. ते आणि त्यांनी केलेली विधाने असंवेदनशील आहेत, असे जावेद अख्तर म्हणाले. “कोणताही देश सारखा नसतो. देशातील प्रत्येक नागरीक सारखा असू शकत नाही. जर एखाद्या देशाचे सरकार वाईट असेल तर, त्याचा परिणाम प्रथम त्याच्या जनतेवर होतो. आपला मुद्दा फक्त सरकार, लष्कर आणि अतिरेक्यांशी असला पाहिजे. आपली पूर्ण सहानुभूती त्या निष्पाप लोकांशी असली पाहिजे जे या दहशतवाद्यांमुळे त्रस्त आहेत, असे ते म्हणाले.
Operation Sindoor- हिंदुस्थानने मिराज, JF-17 सह पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं पाडली
तुम्ही हिंदूंना का शिवीगाळ करता?
“मी पाकच्या लष्करप्रमुखाचे भाषण यूट्यूबवर पाहिले. तो खूप असंवेदनशील व्यक्ती वाटतो. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही वाईट आहोत तर, हिंदुस्थानींना शिव्या द्या. पण तुम्ही हिंदूंना शिव्या का देत आहात? त्यांना हे कळत नाही का की, पाकिस्तानातही हिंदूंची लोकसंख्या आहे? तुम्ही तुमच्या स्वतःच्या लोकांचा आदर करू नये का? तुम्ही कोणत्या प्रकारची माणसं आहात? तुम्ही काय म्हणत आहात? याची तुम्हाला जराही समज नाही, असे म्हणत अख्तर यांनी टीका केली.
अनेक अरब देशांनी घातली पाकिस्तानींसाठी व्हिसा बंदी
पाकच्या एका क्षेपणास्त्राचे नाव अब्दाली आहे. अब्दालीने मुस्लिमांवर हल्ला केला होता. तर मग तो तुमचा हिरो कसा? तुमच्या भूमीवर जन्मलेल्या लोकांचे काय? तुम्ही हल्लेखोराचे स्वागत करत आहात? तुम्हाला इतिहासाची काही समज आहे का? तुम्ही ज्या समुदायांना स्वतःचे म्हणता त्यांनाच यांच्याशी काहीही संबंध ठेवायचे नाहीत. अनेक अरब देशांनी पाकिस्तानींसाठी व्हिसा बंदी घातली आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर एखादा व्यक्ती म्हणतोय की ‘मी शाहरुख खानला ओळखतो’, पण शाहरुख खानलाच माहिती नाही की हा व्यक्ती कोण आहे. पाकिस्तानची स्थिती आज अशीच आहे, असेही त्यांनी म्हटले.
पाकिस्तानी सैन्य स्वतःच्या लोकांचाही आदर करत नाही
अख्तर यांनी पाकिस्तानी सैन्य स्वतःच्या नागरिकांचा आदर करत नाही, याबद्दलचा आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “पाकिस्तानींचे आणखी एक सत्य म्हणजे जेव्हा आपला एखादा सैनिक मृत्युमुखी पडतो तेव्हा आपण त्याला अभिवादन करतो, पण जेव्हा कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिक मृत्युमुखी पडले तेव्हा त्यांनी त्यांचे मृतदेहही घेतले नाहीत. हिंदुस्थानींनी त्यांचे योग्य अंत्यसंस्कार केले. आमच्या एका उच्चपदस्थ सैनिकाने आपल्या शहीद सैनिकांचे फोटो काढले, एक अल्बम बनवला आणि तो पाकिस्तानी लोकांना पाठवला. त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. नंतर, त्यांनी ते अनधिकृतपणे स्वीकारले.” असे जावेद अख्तर यांनी यावेळी सांगितले.
अमेरिकेतून हिंदुस्थानात पैसे पाठवणं महागणार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नवीन कायदा आणण्याच्या तयारीत