
जय कवळी हे बॉक्ंिसग फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) मधील एकाही पदासाठी निवडणूक लढणार नाही. याप्रसंगी ते म्हणाले, बीएफआयच्या कोणत्याही पदासाठी मी निवडणूक लढणार नाही. युवांना काम करण्याची संधी मिळावी यासाठी मी हा निर्णय घेत आहे. यामुळे इतर व्यक्तीही पद सोडून युवकांना नेतृत्व करण्याची संधी देतील, असेही जय कवळी यावेळी म्हणाले. सध्या महासचिव असलेले जय कवळी बॉक्ंिसग या खेळाशी मात्र जोडलेले राहणार आहेत. दरम्यान, लवकरच बीएफआयची निवडणूक घेण्यात येणार आहे.

























































