
केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (01 फेब्रुवारी 2026) संसदेमध्ये नवव्यांदा वर्ष 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. मंदिरांसाठी 5 हजार कोटींचा तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या ‘देवां’चा विकास होणार? मंदिरांसाठी क्राएटिया काय लागणार? असे सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जयंत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आणि काही प्रश्न उपस्थित करत अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, “मंदिरांसाठी पाच हजार कोटींची तरतुद, असा उल्लेख करण्यात आला आहे. ही मंदिरं कुठली बांधणार? कुठल्या मंदिरांसाठी करणार? त्यांना क्राएटिया काय लागणार? का यांच्या मनात जे असेल ज्या देवांवार यांची भक्ती आहे त्यांचा विकास होणार का?.” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच यासंदर्भात कायतरी क्राएटिया सरकार ठरवेल अशी अपेक्षा असल्याचं सुद्धा ते म्हणाले आहेत.
Budget 2026 – या अर्थसंकल्पात जुन्याच गोष्टी नवीन पॅकमध्ये लेबलसह दिल्यात; रोहिणी आचार्य यांची टीका
उद्योजग, महाराष्ट्र आणि शेतकऱ्यांच्या हातात काहीच लागलं नाही, हा मुद्दा त्यांनी यावेळी बोलताना अधोरेखीत केला. ते म्हणाले की, “उद्योजग आणि देशातल्या उद्योगांना या अर्थसंकल्पात फार काही भरीव बुस्ट मिळेल, असं दिसत नाही. त्यामुळे शेअर बाजार गेले काही तास कोसळतोय. निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडल, पण शेतकऱ्यांच्या हातात काही नाही, महाराष्ट्राला विशेष काहीच हाताला लागलं नाही. मुंबई-पुणे सारख्या शहरांच्या सुधारणांसाठी असेल किंवा इतर शहरांसाठी काही केलेलं नाही.” अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच “यासाठी महाराष्ट्रातले संसदेतले सदस्य हे बजेटवर बोलताना निर्मला सीतारामन यांचं त्याकडे लक्ष वेधून घेतील.” अशी अपेक्षाही यावेळी जयंत पाटील यांनी बोलून दाखवली.






















































