लेख : आपला कचरा पुन्हा आपल्या दारात !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>जयेश राणे<<

निसर्ग हा मनुष्यासाठी ‘आरसा’ आहे. मनुष्य किती निष्ठtर आहे याचा चोख लेखाजोगा त्याच्याकडे आहे. मुंबई किनारी फेकल्या गेलेल्या या कचऱ्याच्या माध्यमातून निसर्गाने दाखवलेल्या ‘आरशा’कडे पाहून तरी बोध घेतला जाईल का? अन्यथा आपला कचरा पुनः पुन्हा आपल्याच दारात निसर्गाकडून फेकला जाणार यात शंका नाही. कचरा कुठे टाकावा हे ज्याला कळते तोच खरा सुशिक्षित आहे असे म्हणता येईल. त्यामुळे सुशिक्षितपणा दिसला पाहिजे. आपण कसे अशिक्षित आहोत हे निसर्गाने कचरा पुन्हा किनारी फेकून देत दाखवून दिले आहे.

निसर्ग हा मनुष्यासाठी ‘आरसा’ आहे. मनुष्य किती निष्ठूर आहे याचा चोख लेखाजोगा त्याच्याकडे आहे. मुंबई किनारी फेकल्या गेलेल्या या कचऱ्याच्या माध्यमातून निसर्गाने दाखवलेल्या ‘आरशा’कडे पाहून तरी बोध घेतला जाईल का? अन्यथा आपला कचरा पुनः पुन्हा आपल्याच दारात निसर्गाकडून फेकला जाणार यात शंका नाही.

‘कचरा’ म्हणजेच त्या घटकातील आवश्यक त्या भागाचा उपयोग केल्यावर अनावश्यक भाग टाकून देणे. वस्तुविषयी म्हणावे तर आता त्या वस्तूचा उपयोग होणार नाही असे लक्षात आल्यावर तिला ‘कचरा’ म्हणून वर्गीकृत केले जाते. ही प्रक्रिया अविरतपणे चालू राहात असल्याने कचरा वाढण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. घरामध्ये कचरा होऊ नये यासाठी बहुतांश मंडळी आवश्यक स्वच्छता करत असतात. तोच नीटनेटकेपणा पोषाखाविषयीही कायम राखला जात असतो. म्हणजेच एकंदरीत स्वच्छता आणि टापटीप राहण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते. हा केवळ वैयक्तिक विचार झाला. मात्र हाच विचार व्यापक स्तरावर झाला तर समुद्राकडून जशी मुंबईच्या विविध समुद्रकिनाऱयांवर कचऱ्याची भेट मिळाली ती मिळणार नाही.

मुंबई महानगराच्या समुद्रकिनाऱयांवर १३ आणि १४ जुलै या मोठय़ा भरतीच्या दोन दिवसांत सुमारे ३२५ टन कचरा समुद्राने किनाऱ्यावर फेकला. त्यानंतरही भरतीच्या दिवसांत समुद्राकडून अशीच भेट मुंबईच्या नागरिकांना मिळणार यात शंका नाही. पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणावर कचरा समुद्रकिनारी येत असता, पण दोन दिवसांत सुमारे ३२५ टन कचरा समुद्राकडून फेकला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवरून वेगाने प्रसारित झाले. निसर्गाची स्वच्छता कशी असते हे यातून कळते. निसर्गाने तरी अनावश्यक कचरा आपल्या उदरात किती काळ ठेवावा? ज्याने तो केला आहे, त्यालाच तो साभार परत करणे निसर्गाला कदापि अशक्य नाही. मात्र कचऱ्याविषयी आवश्यक ती दक्षता घेत सरकारी सूचनांचे पालन करणे मनुष्याला सहज शक्य आहे, पण मानवी बुद्धीला स्वच्छतेविषयीच्या सूचनेचे पालन करणे जड जाते आणि अंगवळणी पडलेल्या अस्वच्छतेच्या सवयीमुळे स्वच्छता हा विषयच पचनी पडेनासा होतो.

निसर्ग हा मनुष्यासाठी ‘आरसा’ आहे. मनुष्य किती निष्ठtर आहे याचा चोख लेखाजोगा त्याच्याकडे आहे. मुंबई किनारी फेकल्या गेलेल्या या कचऱ्याच्या माध्यमातून निसर्गाने दाखवलेल्या ‘आरशा’कडे पाहून तरी बोध घेतला जाईल का? अन्यथा आपला कचरा पुनः पुन्हा आपल्याच दारात निसर्गाकडून फेकला जाणार यात शंका नाही.

अनेकजण पावसाळ्याच्या दिवसांत समुद्रकिनारी बहुसंख्येने भटकंती करत असतात. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा अंगावर घेण्यात त्यांना आनंद वाटतो. समुद्रकिनारी काय केले या गोष्टी समाजमाध्यमांवरून इतरांना कळण्यासाठी हा खटाटोप करण्यात येतो असे म्हणता येईल. समुद्राने किनाऱ्यावर फेकलेला कचरा गोळा करण्यास, रस्त्यांची स्वच्छता करण्यास मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांना पुष्कळ मेहनत घ्यावी लागली असणार हे किनाऱ्यावरील रस्त्यांवर सर्वदूर पसरलेला कचरा पाहता कळते. हा कचरा वाहून नेण्यासाठी पालिकेला आलेला अतिरिक्त खर्चही मोठा असणार. मात्र त्याचा विचार कोण करणार? समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यास येणारे अशा वेळी पालिकेच्या कर्मचाऱयांना सहाय्य करताना दिसत नाही, मात्र रस्ते स्वच्छ झाल्यावर ती मंडळी निःसंशयपणे पुन्हा तिथे दिसू लागतील. मुंबईतील अस्वच्छ असलेले किनारे स्वच्छ करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था झटत असतात. मात्र सवा कोटींच्या घरात असलेली शहराची लोकसंख्या लक्षात घेता स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱयांचे प्रमाण नगण्य आहे. कचरा करणारे कोटय़वधी संख्येने आणि स्वच्छता करणारे केवळ मोजके हे समीकरणच जुळत नाही. त्यामुळे काही कालावधीनंतर मुंबई महानगर म्हणजे ‘कचऱ्याचे बेट’ होईल असे कुणाला वाटल्यास नवल ते काय ? पावसाळ्यात शहराची अवस्था बकाल झालेली असते. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत प्रथमच मुंबईत आलेला व्यक्ती पुढील वर्षीच्या पावसाळ्यात येथे येण्यापूर्वी नक्कीच विचार करील. दुसरे सूत्र असे की, नाक आणि तोंडातून अस्वच्छ पाणी शरीरात गेल्यास हमखास शरीर धोक्याची घंटा देते. परिणामी ओढवून घेतलेले शारीरिक दुखणे त्रासदायक ठरते. विशेषतः समुद्राच्या लाटांत भिजणाऱ्या सर्वांनीच ही गोष्ट नीट लक्षात घ्यायला हवी. अनेक जण आम्ही शुद्ध पाणीच पितो, रस्त्यावर असलेल्या पाणपोयीवरील पाणी पित नाही याचे प्रदर्शन करण्यासाठी हातामध्ये ‘मिनरल वाटर’च्या प्लॅस्टिकच्या बाटल्या घेऊन फिरत असतात. ज्यांना पाणपोईवरील पाणी चालत नाही त्यांना समुद्राचे ‘ते’ पाणी तोंडात गेलेले कसे चालते?

गटारे, नाल्यांचे सांडपाणी समुद्रालाच जाऊन मिळत असते. जो कचरा कचरापेटीत टाकला पाहिजे, तो तिथे न टाकता काही नागरिक घराजवळील गटारे आणि नाल्यांत टाकत असतात. यामध्ये उषा-गाद्या, चटया, पोती, प्लॅस्टिक पिशव्या यांचा प्रामुख्याने समावेश असतो. आपण टाकलेला हा कचरा पुन्हा आपल्यालाच त्रासदायक ठरणार आहे याचा विचारच होत नाही. अशा अविचारीपणामुळेच रोगराई पसरते आणि नोकरी-व्यवसाय, शाळा-महाविद्यालयात जाण्यास शरीर तंदुरुस्त नसल्याने डॉक्टरच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. आरंभी छोटा वाटणारा आजार शरीरात पसरल्यावर प्राणही गमवावे लागतात. कचरा आपले आयुष्य कसे संपवू शकतो हे गांभीर्याने लक्षात घेतले, तर अस्वच्छतेस आळा घालता येईल आणि शहर स्वच्छ ठेवता येईल. समुद्रात सांडपाणी सोडण्याची प्रक्रिया चालूच राहणार आहे. मात्र त्या पाण्यात घन कचरा आपल्याकडून टाकला जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. कचरा कुठे टाकावा हे ज्याला कळते तोच खरा सुशिक्षित आहे असे म्हणता येईल. त्यामुळे सुशिक्षितपणा दिसला पाहिजे. आपण कसे अशिक्षित आहोत हे निसर्गाने कचरा पुन्हा किनारी फेकून देत दाखवून दिले आहे. निसर्गावर माणसाने आघात करतच राहायचे आणि निसर्गाने ते सोसत राहायचे हे अतीच झाले आहे. त्यामुळेच निसर्गाने मनुष्याचा ‘कचरा’ केला आहे.