
सामना ऑनलाईन, मुंबई
भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या कार्यालयावर दरोडा पडला आहे. सोमवारी मध्यरात्री इंडियन ऑइल नगर समोर असलेल्या त्यांच्या कार्यालयात चोर घुसले होते. या कार्यालयातील कपाटे फोडण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. डी.एन.नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती प्रदीप कुरतडकर यांनी दिली.

























































