तुरुंगातून वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या जदयू आमदाराचे रुग्णालयात धुम्रपान

बिहारमधील मोकामा मतदारसंघाचे जदयूचे बाहुबली आमदार अनंत सिंह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अनंत सिंह हे एका रुग्णालयात सिगारेट ओढताना दिसत आहे.

अनंत सिंह हे सध्या दुलारचंद यादव हत्या प्रकरणात बेऊर तुरुंगात कैद आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी IGIMS रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयात ते सिगारेट ओढत आपल्या समर्थकांसोबत जाताना त्या व्हिडीओत दिसत आहेत. त्यांच्यासोबत पोलीस देखील असून त्यांना मिळणाऱ्या स्पेशल ट्रिटमेंटवरून संताप व्यक्त केला जात आहे.

नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणूकीत अनंत सिंह यांनी तुरुंगातूनच निवडणूक लढवली होती व ते जिंकले देखील होते. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची 28 हजार मतांनी पराभव केा होता.