
वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय स्तरावर घेण्यात येणाऱया जेईई आणि नीटच्या प्रवेश परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता जेईई मेनची परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. तर जेईई अॅडव्हान्सची परीक्षा 27 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. तर नव्या घोषणेनुसार नीटची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी घेण्यात येईल.



























































