
सामना ऑनलाईन, मुंबई
दिवाळीखोरीत निघालेल्या जेट एअरलाइनचे शेअर्स आज तब्बल 41 टक्क्यांनी घसरले. बीएससीमध्ये 41 तर आणि एनएसई सेन्सेक्समध्ये 40 टक्क्यांची घसरण झाली. काल स्टेट बँक इंडियासह 26 कर्जदारांची बैठक झाली. यावेळी जेटमधील हिस्सेदारीची लिलाव प्रक्रिया बारगळली. त्यामुळे कर्ज देणाऱ्या बँकांनी कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) अर्ज दाखल केला आहे. त्याचा परिणाम आज कंपनीच्या शेअर्समधील घसरणीत पाहायला मिळाला.




























































