
झारखंडमध्ये एका रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. येथल्या डॉक्टरांनी थॅलेसेमियाच्या रुग्णांना एचआयव्ही पॉझिटिव्ह ब्लड चढवल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला आहे. मुलांची तपासणी केली असता चार मुलं एचआयव्हि पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे संक्रमण झालेल्या मुलांची संख्या 5 वर पोहोचली आहे.
उच्च न्ययालयाच्या आदेशानंतर शनिवारी रांचीच्या आरोग्य विभागाचे पथक चाईबासा पोहोचले. तपासणी केली असता आठवडाभरात या रुग्णालयात अॅण्टी रेट्रोवायरल थेरपी सेंटरमध्ये पाच मुलं एचआयव्ही पॉझिटिव्ह सापडले आहेत. ही बाब चिंताजनक आहे. या घटनेची चौकशी सुरु आहे. सर्व मुलं थॅलेसिमियाचे रुग्ण होते. त्यांना चाईबासा .येथील एका रुग्णालयाच्या ब्लड बॅंकमध्ये रक्त चढविण्यात आले होते. या घटनेनंतर चाईबासा रुग्णालयात रक्त चढविण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये भितीचे वातवरण पसरलेले आहे.
चाईबासा रुग्णालयात 7 वर्षीय थॅलेसिमिक रुग्णाच्या वडीलांनी शुक्रवारी पश्चिमी सिंहभूमच्या डीसी यांच्याकडे आपल्या मुलाला एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्त दिल्याबद्दल तक्रार केली. मुलाच्या पॉझिटिव्ह अहवालानंतर पती पत्नी दोघांनी चाचणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आले. वडिलांच्या दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी या रुग्णालयात त्यांच्या मुलाला रक्त चढविण्यात आले आणि 18 ऑक्टोबर रोजी मुलाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर, डीसीने चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, उच्च न्यायालयानेही स्वतःहून दखल घेत चौकशीचे आदेश दिले. शनिवारी, रांची विभागाचे एक पथक पोहोचले आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.
जमशेदपूर येथील एमजीएम मेडीकल कॉलेजमधील मेडिसीन विभागाचे माजी प्रमुख डॉ.निर्मल कुमरा यांच्यामते जर एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलाने नियमित औषधे घेतल्यास त्याला पुढील 15 वर्षापर्यंत कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.




























































