झारखंडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार, एक जवान शहीद

प्रातिनिधिक फोटो

झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत कोब्रा बटालियनचा एक जवान देखील शहीद झाला आहे.

झारखंडच्या गोमिया शहरातील बिरहोर्डेरा जंगलात काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर या जंगलात जवानांनी शोध मोहिम सुरू केली होती. सकाळी सहाच्या सुमारास ही शोध मोहिम सुरू झाली. यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले तर एक जवान शहीद झाला. या चकमकीत 25 लाखांचे बक्षिस असलेला नक्षलवादी कुंवर मांझी उर्फ सहदेव मांझी देखील ठार झाला आहे. या नक्षलवाद्यांकडून जवानांनी एके 47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. अद्याप या जंगलात शोध मोहिम सुरू आहे.