
झारखंडमधील उद्योगपती सुरेश जालान यांनी आपल्या कुटुंबासाठी तब्बल 90 कोटी रुपये किमतीचे प्रायव्हेट जेट खरेदी केले आहे. हे जेट 10 सीटरचे आहे. जालान यांनी या जेटसाठी 90 कोटी रुपये मोजले असल्याने त्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
जालान हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत त्यांचा 299 वा क्रमांक आहे. ते गिरिडीहचे प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रायव्हेट जेटने गिरिडीह विमानतळावरून सिंगापूरसाठी पहिले उड्डाण केले. प्रजासत्ताक दिनी त्यांनी आपल्या नव्या जेटचे पूजनसुद्धा केले. या विमानाने पहिला प्रवास सिंगापूरला जाण्यासाठी केला. उद्योगपती सुरेश जालान यांची कंपनी कार्बन रिसोर्सेस कार्बनयुक्त कच्चा माल तयार करते. त्यांचा व्यवसाय देशातील पाच राज्यांत पसरलेला आहे. कार्बन रिसोर्सेस कंपनीची स्थापना 1991 साली करण्यात आली होती. इलेक्ट्रोड पेस्टची सर्वात मोठी आणि एकमेव उत्पादक कंपनी आहे.
कंपनी पॅल्साइंड पेट्रोलियम कोक, इलेक्ट्रिकल पॅल्साइन्ड अँथ्रासाईट, रॅमिंग पेस्ट, कार्बरायझर्स आणि इंजेक्शन कार्बनदेखील तयार करते. हे जेट देशातील सर्वात महागडे आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे प्रायव्हेट जेट असून त्याची किंमत 16 कोटी आहे, तर जगातील सर्वाधिक महाग प्रायव्हेट जेट सौदीच्या राजाकडे आहे.