जि.प.च्या मालमत्तेची माहिती गुलदस्त्यात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

जिल्हा परिषदेच्या महामोगालाच्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या व इतर जागांची माहिती अजूनही बाहेर येत नसल्यामुळे जि.प. पदाधिकारी व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या शहरात तसेच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जागा व मालमत्ता आहेत. संभाजीनगरातील नारळीबाग, रेल्वेस्टेशन परिसरातील जागा अतिक्रमणात अडकल्या आहेत. काही प्रकरणे ज्यात प्रविष्ठ असूनही काही जागा जिल्हा परिषदेकडून व्यवस्थित बाजू मांडण्यात न आल्यामुळे हातून गेल्या आहेत. काही जागांचे भाडेपट्ट्यांचे करार जुने असून, त्यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. त्यामुळे नवीन दराने भाडे मिळेल. याचा जिल्हा परिषदेला फायदाच होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या जागांची, मालमत्तेची माहिती तात्काळ मिळावी, अशी मागणी सदस्यांनी वेळोवेळी सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकांमध्ये करण्यात आली. परंतु अजूनही पुरेशी माहिती उपलब्ध झाली नसल्याचे कारण देऊन माहिती गुलदस्त्यात ठेवली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. केवळ जिल्हा परिषदेच्या नव्हे तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या जागांची माहितीही समोर यावी, अशी मागणी केली जात आहे.