जिंतूर एमआयडीसीमध्ये पाण्यासाठी भटकंती; समस्या सोडवण्याची मागणी

339

जिंतूर तालुक्यातील पुंगळा एमआयडीसीमध्ये पाण्यासाठी रहिवाशांची भटकंती सुरू आहे. पाणी टंचाईच्या या गंभीर समस्येकडे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

एमआयडीसीतील पिण्याच्या पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून नळ योजनेची टाकीसह पाईपलाईन असून उद्योजकांना या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दोन महिन्यांपासून एमआयडीसीमध्ये बोरला पाणी नाही. त्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे. मोटार दुरुस्त करून आणली. मात्र, तरीही पाण्याची समस्या सुटली नाही. पिण्याचे पाणीही चँकरने मागवावे लागत आहे. एमआयडीसी वसाहतीत छोटा-मोठा व्यवसाय करणारे उद्योजक, मालक, मजूर आहेत. ऐन उन्हाळ्यात या भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ही समस्या सोडवण्याची मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या