जिओ फायबरचा धमाकेदार प्लान लॉन्च, अनलिमिटेड डेटाबरोबरच 30 दिवस सर्व सेवा मोफत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स जिओने सोमवारी ’नए इंडिया का नया जोश’ नावाने नवीन धमाकेदार प्लान लॉन्च केला. या प्लानच्या नवीन ग्राहकांना अनलिमिटेड डेटाबरोबरच 30 दिवसांसाठी सर्व सेवांचा मोफत आनंद लुटता येणार आहे. या महिनाभराच्या प्री ट्रायलमध्ये अपलोडिंग आणि डाऊनलोड या दोन्हींचा स्पीड एकसारखा म्हणजेच 150 एमबीपीएस राहणार आहे. तसेच कंपनीतर्फे ग्राहकांना 4के सेट टॉप बॉक्स आणि 10 ओटीटी ऍप्सचे प्री सबक्रिप्शन देण्यात येणार आहे.

‘नए इंडिया का नया जोश’च्या टारिफ प्लान्सची किंमत 399 रुपयांपासून 1499 रुपयांपर्यंत आहे. ग्राहक एक महिन्याच्या प्री ट्रायलनंतर आपल्या आवडीचा प्लान निवडू शकतात. ग्राहकांना सेवा न आवडल्यास ते प्री ट्रायलचा लाभ घेतल्यानंतरही कनेक्शन कट करू शकतात. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. दरमहा 399 रुपयांच्या सर्वात स्वस्त प्लानमध्ये इंटरनेटचे 30 एमबीपीएस स्पीड असेल. या प्लानसह 699 रुपयांच्या प्लानमध्ये कोणत्याही ओटीटी ऍप्सचे सब्सक्रिप्शन मिळणार नाही. 699 रुपयांच्या प्लानमध्ये इंटरनेटचे स्पीड 100 एमबीपीएस असेल. तसेच 999 रुपयांच्या प्लानमध्ये इंटरनेटचे स्पीड 150 एमबीपीएस आणि 1 हजार रुपये किंमतीच्या 11 ऍप्सचे सब्सक्रिप्शन मिळेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

हिंदुस्थानला संपूर्ण जगाचा ‘ब्रॉडब्रॅण्ड लीडर’ बनवण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी 1600 हून अधिक शहरांमध्ये ब्रॉडब्रॅण्डची सेवा उपलब्ध केली जाणार आहे. या चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन जिओचे डायरेक्टर आकाश अंबानी यांनी केले आहे.