
हिंदुस्थान – चीन यांच्यामधील तणावाच्या वातावरणामुळे हिंदुस्थानात चिनी वस्तूंविरोधात संताप व्यक्त होऊ लागला आहे. क्रिकेटवरही याचा परिणाम झाला आहे. देशामध्ये होत असलेल्या तीव्र विरोधामुळे बीसीसीआयने अखेर गुरूवारी विवो या चिनी कंपनीसोबतचा करार मोडला आहे. त्यामुळे या वर्षी आयपीएलमध्ये विवो ही कंपनी प्रायोजक म्हणून असणार नाही. आता बीसीसीआयने या वर्षीच्या आयपीएलसाठी नव्या प्रायोजकाचा शोध सुरू केला असून रिलायन्स, ऍमेझॉन यांसारख्या कंपन्या प्रायोजकासाठीच्या रेसमध्ये असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.


























































