
जम्मू-कश्मीरला सोमवारी रात्री दोन तासात भूकंपाचे एकापाठोपाठ चार धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 4.7 आणि 5.5 रिश्टर स्केल एवढी होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
भूकंपाचा पहीला धक्का सोमवारी रात्री 10 वाजून 42 मिनिटांनी बसला. त्याची तीव्रता 4.7 एवढी होती. त्यानंतर सहा मिनिटात 5.5 रिश्टर स्केल एवढा भूकंपाचा धक्का बसला.
तसेच अंदमान आणि निकोबार द्विपसमूहालाही रात्री 10 वाजून 29 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता रिश्टर स्केल 5 होती.
पाकव्याप्त कश्मीरमध्येही भूकंपाचा धक्का
दुसरीकडे पाकव्याप्त कश्मीरमधील गिलगिट-बाल्टीस्तानमध्येही सोमवारी 5 वाजून 19 मिनिटांनी भूकंपाचा हादरा बसला. त्याची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल एवढी होती. गिलगिट,घाजर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.






















































