जम्मू-कश्मीरमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। तंगधर

जम्मू-कश्मीरमधील तंगधर सेक्टरमध्ये शनिवारपासून सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. सोमवारी सुरक्षा दलाने कुपवाडामधील तंगधर सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यामुळे या दहशतवादविरोधी मोहिमेत सुरक्षा दलाने एकूण ५ जणांचा खात्मा केला आहे. दरम्यान, या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. ही चकमक अद्याप सुरू आहे.

करनाह येथील लष्कराच्या ईगल छावणीजवळ काहीजण घुसखोरी करत असल्याचे जवानांच्या लक्षात आले. त्यानंतर जवानांनी त्यांना आत्मसर्मपण करण्याचे आवाहन केले. पण घुसखोरांनी जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यास २० जाट युनिटच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. शनिवारी सुरू झालेली ही चकमक अदयापही सुरू आहे. जवानही दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देत आहेत.

summary-jk- five terriorist killed