
जम्मू-कश्मीरमध्ये केशरची शेती मोठय़ा प्रमाणावर केली जाते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता ‘मिशन केशर’ हाती घेतले आहे. येत्या वर्षभरात केशरचे उत्पादन दुपटीने वाढवण्याचे लक्ष्य सरकारने समोर ठेवले आहे. शेतकऱयांना या माध्यमातून लाखो रुपये कमावण्याची संधी देण्यात येणार आहे.
कश्मीरमधील आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने सरकारने अनेक योजना तयार केल्या आहेत. त्यापैकीच केशरच्या शेतीला चालना देणे ही त्यापैकीच एक आहे. एका दौऱयादरम्यान मोदी यांनी जास्तीत जास्त लोकांनी केशरची शेती करण्याचे आवाहन केले होते.

























































