
सामना ऑनलाईन। श्रीनगर
पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात मंगळवारी जखमी झालेल्या बीएसएफ जवानाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सीमेजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. या जवानाचे डोळे काढण्यात आले होते, एक पाय, एक हातही कापण्यात आला होता. गळा चिरून त्याचा मृतदेह हिंदुस्थानच्या सीमेवर फेकण्यात आला होता. पाकिस्तानच्या बॅट टीमने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले आहे.
बीएसएफची एक तुकडी सीमेवरील तारेच्या कुंपणाची पाहणी करण्यासाठी सीमेवर गेले होते. त्याचवेळी अचानक सीमेजवळ दबा धरून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यास जवानांनाही चोख प्रत्युत्तर दिले. पण यावेळी उडालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला. दरम्यान, पाकिस्तानी सैनिकांना हुसकावण्यासाठी इतर जवान सीमेजवळ गेल्याने जखमी जवान तिथे एकटाच होता. याचवेळेचा गैरफायदा घेत पाकिस्तानी सैनिकांनी जखमी जवानाचे अपहरण केले. इतर जवान सीमेवरून परतले असता त्यांना जखमी जवान तिथे आढळला नाही. यामुळे त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण त्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अखेर रात्री उशिरा सीमेवर जवानाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला. पाकिस्तानी सैनिकांनी २ तास जवानाला डांबून ठेवले होते. त्यानंतर हालहाल करून त्याला ठार केले , अशी माहिती एका हिंदी वेबसाईटने दिली आहे.
दरम्यान, पाकिस्तानी सैनिकांच्या या कृत्याची गंभीर दखल बीएसएफने घेतली आहे. तसेच या घटनेचा पाकिस्तानकडून खुलासा मागावा अशी मागणी बीएसएफकडून डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन(DGMO) कडे करण्यात आली आहे.
Border Securty Force (BSF) has raised the issue of killing of its jawan with the Pakistan Rangers at the sector level. BSF has also sought Director General of Military Operations (DGMO) to raise the issue with Pakistan at its level.
— ANI (@ANI) September 19, 2018


























































