जम्मू-कश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नौशेरा येथे बुधवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात जोरदार चकमक झाली. यात दोन जवान शहीद झाले आहेत.

या भागात अजून तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करून काही घुसखोर हिंदुस्थानी हद्दीत आल्याचे बोलले जात होते. मात्र मंगळवारी काही संशयित परिसरात फिरत असल्याचे स्थानिकांनी सुरक्षा दलाला कळवले. त्यानंतर सुरक्षा दलाने तात्काळ शोध मोहिम राबविली. यादरम्यान, दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यात दोन जवान शहीद झाले आहेत. अजूनही ही चकमक सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.