
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) सोमवारी रात्री काही विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याविरोधात वादग्रस्त नारेबाजी केली. या नारेबाजीचा व्हिडीओ आज समोर आला असून त्यात काही विद्यार्थी ‘मोदी-शहा की कब्र खुदेगी, जेएनयू की धरती पर,’ अशा घोषणा देताना दिसतात. उमर खालीद आणि शरजील इमाम यांच्या समर्थनार्थ ही नारेबाजी झाल्याचा आरोप भाजपने केला आहे, तर हा नाराजी व्यक्त करण्याचा प्रकार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उमर आणि शरजीलची जामीन याचिका फेटाळून लावली. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांनी याचा निषेध करत रोष व्यक्त केला. जेएनयूमध्ये ही नारेबाजी उमर खालीद आणि शरजील इमाम यांच्या समर्थनासाठी झाली असून हा निषेध नसून राष्ट्रविरोधी विचारधारेचा प्रसार असल्याचा आरोप भाजप प्रवत्ते प्रदीप भंडारी यांनी केला आहे.


























































