
ऐन पावसाळय़ात जोगेश्वरातील काही भागांमध्ये रस्त्यावरचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरून त्यांचे नुकसान होत होते. मात्र, शिवसेनंमुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्र, शाखा क्र. 72 टीवोली टेरेस येथे रस्त्यामुळे रहिवाशांची होणारी अडचण लक्षात घेऊन ज्येष्ठ शिवसैनिक जोशी यांनी ही बाब शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने अधिकाऱयांसोबत पाहणी करून गैरसोय दूर केली. याच प्रभागात संस्कृती निर्माण येथे विकासकाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावरचे पाणी रहिवाशांच्या घरात जात असल्याचे शाखाप्रमुख अमरनाथ मालवणकर यांनी निदर्शनास आणले. विकासकाचे बांधकाम साहित्य पाणी वाहून जाण्याच्या मार्गात असल्यामुळे पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होत असल्याचे लक्षात आले. या पार्श्वभूमीवर अनंत (बाळा) नर यांनी विकासकाला पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यास लावले. जोगेश्वरी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, शाखाप्रमुख मंदार मोरे, सुनील शिर्पे, समीक्षा माळी, संजय सावंत, उमेश राणे, शैलेश बांदेलकर, शिरीष चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.