शिवसेनेमुळे जोगेश्वरीकरांचा पाणी प्रश्न सुटला

401

वेरावली जलाशयाला पाणीपुरवठा करणारी भांडुप-मरोशी मुख्य जलवाहिनी फुटल्याने जोगेश्वरीत सोमवारी पाणीपुरवठा अचानक बंद झाल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. मात्र ही माहिती मिळताच शिवसेनेच्या माध्यमातून तातडीने 15 टँकर उपलब्ध करून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात आला.

शिवसेना नगरसेवक अनंत (बाळा) नर यांच्या पाठपुराव्यातून पालिकेचे सात टँकर आणि खासगी आठ टँकरच्या माध्यमातून जोगेश्वरीत पाणीपुरवठा करण्यात आला. यामध्ये मेघवाडी, श्यामनगर, पी.एम.जी.पी., म्हाडा वसाहत / सर्वोदय नगर, इंकलाब नगर, संभाजी नगर, कोकण नगर, न्यू श्यामनगर, न्यू इंदिरा नगर, गोणी नगर येथे पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी  शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर व शाखासमन्वयक  उदय हेगिष्टे, अविनाश  रासम, रतन तावडे, रमा तावडे, मनोहर मोरे, बाळा गायकवाड, विश्वनाथ तानावडे, बाबू कोरगावकर, जनार्दन सकपाळ आदींच्या मदतीने जोगेश्वरी विभागात पाणीपुरवठा करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या