जॉन सीनाने पोस्ट केला रणवीरचा ‘असा’ फोटो, नेटकऱ्यांची हसून पुरेवाट

रेसलिंग दुनियेतला प्रसिद्ध रेसलर जॉन सीना हा त्याच्या मजेशीर पोस्टवरून नेहमीच चर्चेचा विषय असतो. बॉलिवूड हा त्याचा लाडका विषय आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या पोस्ट जॉन शेअर करताना दिसतो. आताही त्याने शेअर केलेल्या एका फोटोने इंटरनेट जगतात धमाल उडवून दिली आहे.

जॉन याने अभिनेता रणवीर सिंग याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रणवीर अतिशय भयानक रुपात दिसत आहे. डोळ्याखाली काळी वर्तुळं, वाढलेल्या केसांच्या जटा आणि डोळ्यात उग्र भाव अशा स्वरूपातला तो फोटो काही दिवसांपूर्वी रणवीरने स्वतःच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटला शेअर केला होता. लॉकडाऊननंतर साधारणतः लोक असे दिसतील, अशी कॅप्शन रणवीरने त्या फोटोखाली दिली होती.


View this post on Instagram

A post shared by John Cena (@johncena) on

हाच फोटो एका वेगळ्या कॅप्शनसह जॉन सीना याने पोस्ट केला आहे. त्याने या फोटोचं नाव स्टोन कोल्ड सिंग असं ठेवलं आहे. स्टोन कोल्ड हाही रेसलिंग जगातला एक प्रसिद्ध रेसलर होता. त्याच्या दिसण्यातील साधर्म्यामुळे जॉनने तो फोटो पोस्ट करून ती धमाल कॅप्शन दिली. हा फोटो पाहून नेटकऱ्यांचीही हसून पुरेवाट झाली आहे. खुद्द रणवीरनेही या फोटोखाली हाहा अशी कमेंट केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या