टेस्ट क्रिकेटमधील सर्वात खराब गोलंदाजी, 35 वर्ष अबाधित राहिला या गोलंदाजाचा ‘नकोसा’ विक्रम

टेस्ट क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांची ‘कसोटी’ लागते. आजपर्यंत यात अनेक विक्रम यात रचले गेले. यातील काहींची वाहवा झाली, तर काहींची तर उडवली गेली. कसोटी क्रिकेटमध्ये एक असाही गोलंदाज आहे ज्याच्या नावावर एक ‘नकोसा’ विक्रम जमा आहे. या गोलंदाजाचे नाव आहे जॉन वॉर.

1950-51 काळात इंग्लंडकडून दोन कसोटी खेळलेल्या जॉन वॉर याचा जन्म आजच्या दिवशी 1927 रोजी झाला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात खराब सरासरीची नोंद जॉन वॉर याच्या नावावर आहे. त्याने आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत 584 चेंडू टाकले आणि 281 धावा दिल्या. या दरम्यान त्याला फक्त 1 बळी मिळवता आला. विशेष म्हणजे फलंदाजांला त्याची कीव आल्याने विकेट सोडली असे बोलले जाते. मात्र त्यामुळे त्याचा गोलंदाजी एव्हरेज 281 एवढा राहिला आणि कसोटी क्रिकेटमधील खराब गोलंदाजाचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला.

35 वर्ष अबाधित होता विक्रम
जॉन वॉर याचक हा विक्रम जवळपास 35 वर्ष अबाधित होता. 1985 ला श्रीलंकेचा फिरकीपटू रॉजर विजयसूर्या याने हा विक्रम मोडला. विजयसूर्या याने 586 चेंडूत 294 धावा दिल्या आणि त्याला एक बळी मिळवता आला. यामुळे त्याचा गोलंदाजीचा एव्हरेज 294 झाला आणि जॉन वॉर याचा नकोसा विक्रम विजयसूर्या याच्या नावावर जमा झाला.

सध्या बांग्लादेशी खेळाडूच्या नावावर हा नकोसा विक्रम
सध्या सर्वात खराब गोलंदाजीचा विक्रम बांगलादेशचा फिरकीपटू नसीम इस्लाम याच्या नावावर आहे. 2008 ते 2012 या काळात त्याने खेळलेल्या कसोटीत 574 चेंडूच्या इस्लाम याने 303 धावा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या