मुंबईतील गरिबी आणि श्रीमंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो सौजन्य-https://mymodernmet.com

सामना ऑनलाईन मुंबई

मुंबई म्हणजे सदा गजबजलेली. रस्ता, हॉटेल, लोकल, बस, टॅक्सी सगळय़ाच गोष्टी गर्दीने ओसंडून वाहणाऱया. मुंबई म्हणजे प्रचंड थकूनही न थांबता, विश्रांती न घेता चालणारे, झोपेतही मनाने धावणारे शहर. मुंबईचे थेट दोन भाग पडतात ते म्हणजे प्रचंड श्रीमंती आणि प्रचंड गरिबी असे. पण मान वर करून बघण्याची फुरसत कोणाकडेच नसते. पण मुंबईच्या गरिबी-श्रीमंतीचे आसमानी रूप टिपले आहे जॉनी मिलर या अमेरिकी एरिअल फोटोग्राफरने. धारावी, माहीम हा एक पट्टा आणि नव्याने उदयाला आलेला वांद्रे-कुर्ला संकुलातील दुसरा पट्टा. या दोन पट्टय़ांचा हवाई मार्गाने वेध घेतला आहे जन्माने अमेरिकन आणि नंतर मानववंशशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत स्थिरावलेल्या जॉनी मिलरने. त्याच्या एरिअल फोटोग्राफीचा विषयही हटके आहे. ‘अनइक्वल सीन्स’ म्हणजे एकाच शहरात एकमेकांना गरिबी-श्रीमंतीत ठळकपणे विभागून टाकणारी दोन असमान दृश्ये ड्रोनच्या मदतीने टिपणे.

‘एकाच शहरातील दोन भीषण विभागून टाकणारी असमानता जीवघेणी आहे. माझ्या फोटोग्राफीच्या माध्यमातून मी त्यावर प्रकाश टाकला आहे. कधीकधी असे वाटते की, लोकांनी ही असमानता स्वीकारली आहे. पण तसे व्हायला नको. गरिबी-श्रीमंतीची ही समस्या लक्षात घेऊन ती सोडविण्यासाठी उपाय शोधणे आवश्यक आहे.’- जॉनी मिलर, एरिअल फोटोग्राफर