मोफत आधार अपडेटसाठी 14 जून डेडलाइन

फ्रीमध्ये आधार अपडेट करण्यासाठी आता केवळ आठ दिवस उरले आहेत. 14 जून 2025 पर्यंत मोफत आधार अपडेट करण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. यानंतर आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ने 10 वर्षांपूर्वी बनवलेल्या आधारकार्डला फ्रीमध्ये बनवण्याची सुविधा सुरू केली होती. याची डेडलाईन अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. 14 डिसेंबर 2024 ला सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन 14 जून 2025 अशी अखेरची डेडलाईन दिली होती.