
सामना प्रतिनिधी । मुंबई
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील ज्युनियर कॉलेजचे शिक्षक आज 18 जानेवारी रोजी पुन्हा आंदोलन करणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या धरणे आंदोलने केली जातील, असे ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
ज्युनियर कॉलेज शिक्षकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे असोसिएशनच्या नेतृत्वाखाली विविध टप्प्यांत आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 11 जानेवारी रोजी राज्यातील सर्व तालुका तहसीलदारांद्वारा शासनास निवेदने देण्यात आली. परंतु अजूनही शासनाने मागण्यांबाबत काहीही निर्णय घेतले नाही म्हणून उद्या दुसऱया टप्प्यात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलने करण्यात येणार आहे. मुंबईत उद्या वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 2 ते 4 या वेळेत हे आंदोलन करण्यात आहे.
तिसऱया टप्प्यात 30 जानेवारी रोजी सर्क विभागीय शिक्षण उपसंचालक/विभागीय मंडळ (बोर्ड) कार्यालयांकर मूक मोर्चे काढण्यात येतील, असे टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले. या आंदोलनानंतरही मागण्यांवर निर्णय न झाल्यास बारावी परीक्षा काळात ‘असहकार आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा शिक्षकांनी दिला आहे.



























































