स्किल्स चॅम्पियनशीपमध्ये विद्यार्थ्यांचा सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्युनिअर स्किल्स 2021 या शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या पहिल्या चॅम्पियनशीपचे 60हून अधिक विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट ऍण्ड आंत्रेप्रीन्युअरशीप (एमएसडीई) चे अतिरिक्त सचिव अतुल कुमार तिवारी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्यांना जगातील प्रमुख कौशल्य स्पर्धा वर्ल्ड स्किल्स कॉम्पिटिशनचा अनुभव घेण्यासाठी ऑक्टोबर 2022मध्ये शांघायमध्ये जाण्याची संधी मिळणार असून या वेळी ज्युनिअर स्किल्सच्या दुसऱ्या पर्वाचे नाव इंडिया स्किल्स ज्युनिअर करण्याचे तसेच नवीन लोगोचे अनावरण करण्यात आले.