काबूल येथे शाळेवर दहशतवादी हल्ला; 100 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे एका शाळेवर दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाला असून त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हा हल्ला पश्चिम काबूल येथील दश्ते बरेची परिसरात झाला आहे.

हा हल्ला खुरासान प्रांतातील इसिस गटाने केला आहे. या हल्ल्यात हजारा आणि शिया मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आलं आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात देखील दोन शैक्षणिक संस्थांमध्ये दहशतवादी हल्ले करण्यात आले होते. आता हा तिसरा हल्ला असून तो काज उच्च शिक्षण संस्थेत झाला आहे. ही शाळा पोलीस स्टेशनच्या अगदी नजीक असून देखील हा हल्ला करण्यात आला.

हा हल्ला झाला तेव्हा शाळेत परीक्षा सुरू होती. या हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाला असून त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.