
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा पुढील आठवडय़ापासून म्हणजेच 30 जूनपासून सुरू होणार आहे. ही यात्रा गेल्या पाच वर्षांपासून बंद होती. कैलास पर्वतला भगवान शिव यांचे निवासस्थान मानले जाते. गेल्या आठवडय़ात विदेश मंत्रालयाने या यात्रेसंबंधी बैठक बोलावली होती. या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, या यात्रेचे संचालन कुमाऊं मंडळ विकास निगम करणार आहे. यात्रेची सुरुवात दिल्लीहून पिथौरागडच्या लिपुलेख जवळून जाईल. कैलास यात्रेसाठी जगभरातून भाविक येत असतात. जम्मू-कश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर कैलास मानसरोवर यात्रा आल्याने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली.