
केवळ मराठी माणसावरच नव्हे, तर हिंदुस्थानींच्या मनावर आपला सांस्कृतिक ठसा उमटविणारे ‘कालनिर्णय’ आता 50 वर्षांचे झाले आहे. ‘नवे वर्ष, नवे कालनिर्णय’, असे म्हणत एक कोटींहून अधिक घरांच्या भिंतीवर विराजमान असलेले ‘कालनिर्णय 2022’ हे सुमंगल प्रकाशनाद्वारे मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तमीळ आणि तेलुगू या सात भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे.
पंचांग, भविष्य, सणवार, तिथी-नक्षत्र, शास्त्र्ाार्थ ही कालनिर्णयची प्रमुख अंगे असून पंचांग जनसामान्यांसाठी सोपे आणि सुलभ करण्याचा सांस्कृतिक ‘रिफॉर्म’ त्यांनी 50 वर्षांपूर्वीच केला आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून नोटपॅड, श्री स्वामी समर्थ अवधूत पंचांग, स्वादिष्ट, आरोग्य, मीडिअम, थ्री इन वन क्युबिकल, कार, डेस्क अशा विविध प्रकारांतील आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. तसेच वेबसाईट, ऍपच्या माध्यमातून कालनिर्णय नेहमीच काळासोबत चालत आले आहे.























































