अॅम्ब्युलन्सचालक भाड्यावरून भिडले; शवागृहात मृतदेहाचे तीन तास धिंडवडे

कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर खासगी रुग्णवाहिकाचालकांची भाडे आकारणीवरून दादागिरी समोर आली आहे. अॅम्ब्युलन्स आणि शववाहिकाचालक भाड्यावरून एकमेकांना भिडले. या वादात हॉस्पिटलबाहेर मृतदेह घेऊन नातेवाईकांना ताटकळत राहावे लागले. वाद संपत नसल्याने मृतदेह पुन्हा शवागृहात ठेवावा लागला. या सर्वांमध्ये हेळसांड होऊन मृतदेहाचे तीन तास धिंडवडे निघाले. अॅम्ब्युलन्स, शववाहिकाचालकांवर पालिका प्रशासनाचा अंकुश नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

करिया बिच्चप्पा या कामगाराचा कामावर असताना इमारतीवरून पडून मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन रुक्मिणीबाई रुग्णाल यात करण्यात आले. त्यानंतर रोशन शेख या रुग्णवाहिकाचालकाने मृतदेह तेलंगणाला नेण्यासाठी तब्बल २५ हजार रुपये भाड्याची मागणी केली. परिस्थिती हलाखीची असल्याने मृताच्या नातेवाईकांनी रक्कम कमी करण्याचा आग्रह केला, परंतु तो चालक माघार घेण्यास तयार नव्हता. दरम्यान समीर मेमन नावाच्या दुसऱ्या चाल काने केवळ १५ हजार रुपयांत सेवा देण्याची तयारी दर्शवली. नातेवाईकांनी त्याला होकार दिला परंतु पहिला चालक रोशन शेख याने त्याला थेट मज्जाव केला. या वादामुळे तब्बल तीन तास मृतदेह रुग्णालयाच्या शवगृहात पडून राहिला. मध्यस्थी केल्यावर अखेर तीन तासानंतर मृतदेह तेलंगणासाठी रवाना करण्यात आला.

लूट कोण थांबवणार?

काही महिन्यांपूर्वी याच रुग्णालयातच रुग्णवाहिकेचे भाडे भरण्यास पैसे नसल्यामुळे एका अत्यवस्थ महिलेला कळवा रुग्णालयात वेळेवर हलवता आले नव्हते. यातच तिचा मृत्यू झाला होता. आताही तीन तास मृतदेहाची हेळसांड झाली. खासगी रुग्णवाहिकाचालकांकडून लूट सुरू आहे