
कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने तीन बळी घेतले. कल्याण पूर्व येथील चिंचपाडा रोडवर गुलमोहराचे भलं मोठं झाड रस्त्याने जाणाऱ्या एका रिक्षावर कोसळले. या दुर्घटनेत रिक्षाचा संपूर्णपणे चेंदामेंदा होऊन रिक्षा चालक आणि दोन वृद्ध प्रवासी जागीच ठार झाले. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. लता राउत ,तुकाराम ठेगडे असे मृत प्रवाशांचे नाव असून उमाशंकर वर्मा असे रिक्षाचालकाचे नाव आहे
रात्री साडेनऊ वाजता चिंचपाडा परिसरात हव्या रिक्षावर गुलमोहराचे भले मोठे झाड कोसळून प्रवासी रिक्षात अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागासह ,पोलीस यंत्रणा ,स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले. या दुर्घटनेत रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कटरच्या सहाय्याने झाड कापून बाजूला काढण्यात आले. मात्र या दुर्घटनेत रिक्षा चालकासह दोन्ही वृद्ध प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली. हे तिघेही चिंचपाडा परिसरात राहत होते.