कांदळगावात श्री देव रामेश्वरचा बुधवारी जत्रोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

कांदळगाव येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिराचा जत्रोत्सव १९ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त रामेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम, रात्री पालखी प्रदक्षिणा सोहळा व उत्तररात्री पारंपारिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. दि. २० रोजी प्रथेप्रमाणे गाडगे फोडून दहीकाला उत्सवाद्वारे जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.