
सामना ऑनलाईन। कानपुर
बकरा भुंकतो यावर विश्वास ठेवणं तस कठिणच. पण उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे चक्क एक बकरा भुंकायला लागल्याने त्याचा मालक हैराण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मालकाने पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. अशरफ असे या मालकाचं नाव आहे.
बकरी ईद असल्याने अशरफ येथील जाजमऊ चुंगी बाजारात तीन बकरे विकण्यासाठी आला होता. बाजारात बकरे खरेदी करणाऱ्यांची आणि विकणाऱ्यांची गर्दी उसळली होती. अशरफही दोरीने बांधलेल्या तीन बकऱ्यांना घेऊन बाजारात फिरत होते. बकरेही निमूटपणे मालकाच्या मागे जात होते. त्याचवेळी गर्दीचा गैरफायदा घेत एका भामट्याने अशरफ यांच्या हातातून बकरीला बांधलेली दोरी अलगदपणे काढून घेतली. त्याजागी एका काळया कुत्र्याला बांधलेली दोरी अशरफच्या हाताला अडकवली. दरम्यान बकऱ्या व माणसांच्या गर्दीतून वाट काढत असताना अचानक कुत्रा भुंकल्याचा आवाज ऐकू आला.
यामुळे बाजारातील इतर बकऱ्या घाबरल्या व बॅsss बॅ करत इकडे तिकडे धावू लागल्या. यामुळे कुत्र्याला बघण्यासाठी म्हणून अशरफने मागे वळून बघितले आणि त्याला धक्काच बसला. कारण तो ज्याला बकरा समजून बाजारात फिरवत होता तो बकरा नसून कुत्रा होता. यामुळे सगळेजण अशरफवर हसायला लागले.
summary…kanpur-goat start barking






















































