प्रेयसीला भेटायला गेला पण भेटली बायको…; भररस्त्यात हायव्होटेज ड्रामा, एकमेकांना मारहाण, व्हिडीओ व्हायरल…

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पती, पत्नी और वो… असा हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरूणाला अचानक समोर बायको दिसली आणि त्याला धक्का बसला. यानंतर भररस्त्यात त्यांचा हायव्होल्टेज ड्रामा रंगला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महाराजपुर परिसरातील एका गावात राहाणारा प्रविण (बदललेले नाव) गुजरातच्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करतो. दोन दिवसांपूर्वीच तो दिवाळीच्या सुट्टीसाठी त्यांच्या घरी आला होता. तेव्हापासून तो कोणाशीतरी सातत्याने फोनवर बोलत होता. त्यामुळे त्याच्या पत्नीला त्याचा संशय आला. मात्र तिच्याकडे ठोस पुरावा नसल्याने ती शांत होती. दरम्यान दुसऱ्या दिवशी प्रविणने तो काही कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. याच गोष्टीचा फायदा घेत प्रविणची पत्नीने त्याचा पाठलाग केला. आणि काही अंतरावर पोहोचताच तिचा प्रविणवरचा संशय खरा ठरला.

प्रविण नरवाल मोडवर त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला होता. प्रविण आणि त्याची प्रेयसी रस्त्याच्या कडेला बोलत उभे असताना प्रविणच्या पत्नीने ते पाहिले आणि तिचा पारा चढला. आपल्या नवऱ्या परस्त्रीसोबत हसून बोलताना पाहून तिने रौद्ररुप धारण केले. ती धावत धावत प्रविणच्या प्रेयसीकडे गेली आणि काहीही न बोलता प्रविणच्या बायकोने तिचे केस ओढले. यानंतर त्या दोघींमध्ये वाद झाला.

रस्त्याच्या कडेला असलेले काही लोक या भांडणाचा व्हिडिओ काढत होते. तर काहींनी या भांडणात हस्तक्षेप करून तो वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी प्रविण शांत उभा राहून भांडण पाहत होता. यानंतर त्याने भांडण थांबवण्याऐवजी प्रेयसीला त्याचा बायकोला मारायला सांगितले. प्रविणची ही कृती पाहून त्याची बायको आणखी भडकली आणि तिने प्रविणच्या जोरात कानशिलात लगावली. यामुळे प्रविणलाही राग आला आणि त्याने पत्नीवर हात उचलला. बराचवेळ हे भांडण सुरू होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.