…तर कसाब निर्दोष ठरला असता! जामिया प्रकरणावरून भाजप नेते कपिल मिश्रा बरळले

628

आपल्या बेताल वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे भाजप नेते कपिल मिश्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात सापडले आहेत. यावेळी ते जामिया विद्यापीठात पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराचा मुद्दा घेत बरळले आहेत. ‘26/11 मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाब हादेखील पळून लायब्ररीत घुसला असता तर तोही निर्दोष ठरला असता’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी ट्विटरवर सोमवारी केले.

जामिया विद्यापीठातील लायब्ररीत पोलिसांनी 15 डिसेंबरला केलेल्या लाठीमारानंतर गेल्या रविवारी या घटनेचे वास्तव दाखवणारे तीन व्हिडीओ जामिया को-ऑर्डिनेशन कमिटीने जारी केले. यातील एका व्हिडीओत पोलिसांची अमानुषता दिसत असली तरी दुसऱया दोन व्हिडीओत तोंडावर फडके बांधून काही विद्यार्थीही हातात दगड घेतलेले दिसत आहेत. याचाच आधार घेत कपिल मिश्रा यांनी ‘कसाबदेखील पळून लायब्ररीत घुसला असता तर तोही निर्दोष ठरला असता’ असे ट्विट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या