
कॉमेडी स्टार कपिल शर्माला धमक्या देणाऱ्या आणि त्याच्याकडे खंडणी मागणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. पश्चिम बंगालमधून या व्यक्तीली अटक केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप चौधरी असे त्या आरोपीचे नाव आहे. दिलीप चौधरी या आरोपीने कुख्यात गुंड रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाने कपिल शर्माला धमकी दिली. यानंतर त्याच्याकडून 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने केवळ धमकीचे फोन कॉल केले नाहीत तर धमकी देणारे व्हिडिओ देखील कपिल शर्माला पाठवले होते. 22 ते 23 सप्टेंबर दरम्यान, कपिल शर्माला आरोपीकडून सात धमकीचे फोन आले. याशिवाय, त्याला दुसऱ्या नंबरवरूनही धमकी देण्यात आली.
सतत येणाऱ्या धमकीच्या फोनमुळे पोलीस यंत्रणा अलर्टमोडवर होती. मुंबई गुन्हे शाखेने तातडीने तापस सुरू करून आरोपीचा शोध घेतला आणि त्याला पश्चिम बंगालमधून अटक केली. त्याला आता पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे.