कराड – 94 हजारांच्या बनावट नोटांससह तिघांना ताब्यात घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साताऱ्याच्या गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करीत बनावट ९ ४,५०० रुपयांच्या नोटा व देशी बनावटीची पिस्टल जवळ बाळगणारी टोळी जेरबंद जेरबंद केली आहे.याप्रकरणी संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना तीन इसम कोळेवाडी (ता.कराड) येथील एम.एस.ई.बी सब स्टेशनजवळ एकत्र येणार असून त्यांचेजवळ हिंदुस्तानी चलनातील २००० व ५०० रुपयेच्या बनावट नोटा आहेत. अशी गोपनिय माहिती मिळाली होती. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना तात्काळ याची माहिती देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमाणे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांचे नियोजनानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेषांतर करुन एम.एस.ई.बी.सब स्टेशन परिसरामध्ये सापळा लावला.

सदर ठिकाणी ३ इसम आले, त्यांच्या हलचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना हटकले. त्यावेळी तीनही इसम पळून जात असताना पथकातील पोलीस अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता तीनही इसमांकडे २००० रुपये व ५०० रुपयेच्या ९ ४,५०० रुपये चलनातील बनावट नोटा सापडल्या. एका इसमाचे पॅन्टचे कंबरेस एक देशी बनावटीचे पिस्टल असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याला ताब्यात घेतले. याबाबत कराड तालुका पोलीस ठाणेस गुन्हा नोंद केला आहे.

अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, मयुर देशमुख, पंकज बेसके, विजय सावंत यांनी सदरची कारवाई केली आहे .